Monday, October 27, 2014


ती पाकळी फ़ूलाची


वाऱ्याची झुळक माला गंध पांघरून गेली
ती पाकळी फ़ूलाची मज आठवून गेली

पायघड्या पाचोळ्याच्या प्राजक्त शिंपीत होता
चाल माझी त्यावर आडखळून गेली   
ती पाकळी फ़ूलाची मज आठवून गेली

हौद पायथ्याशी तीस साद घालीत होता
ओघळून ती त्यावर, तरंगून त्यात गेली
ती पाकळी फ़ूलाची मज आठवून गेली

दागिना दवबिंदूचा अंगी डळमळत होता
भार त्याचा पेलत ती सावरून गेली
ती पाकळी फ़ूलाची मज आठवून गेली

ढग काळा रूप तिचे झाकोळत एक होता
रवीकिरणाला मोहून  ती बिलगून त्यास गेली
ती पाकळी फ़ूलाची मज आठवून गेली


संकेत कुळकर्णी

Tuesday, August 3, 2010

अटलेला


वारा पडला होता
अन भरमाथ्यातील सुर्याचा प्रकाश आभाळला होता
विशाल देहाचात्या,
आसमंतातसारया ताण भासत होता

भेदक मारा नव्हता,
घोंगवता आक्रोश नव्हता,
त्या सळसळत्या उत्साहाचा
आता लवलेशही शील्लक नव्हता

जगास भीड़णारा तो
आवेग नाहीसा होता
अखंड मिजास त्याचा
अटून अंतास होता

त्याचावर जगणारा शीडही आता
दूर उडाला होता
कोणासच त्याचा आता
उपकार नकोसा होता

लखलखत्या जलाचा तेजस्वी
स्वताच आश्रु पीत होता
कारण साथ असुनही आता
किनारा साथी नव्हता

संकेत कुळकर्णी

Tuesday, March 2, 2010

आठवणं


कशी असते आठवणं ?
धरतीवर पडणारे ते कीरणांचे दीप का त्यावर डोलणारे ते दळदार पीक
पिल्लाची घरट्याकड़े पुन्हा पुन्हा बोलवण
का खोलवर दडलेली एखादी गोडशी साठवण
कशी असते आठवणं ?

आठवणं म्हणजे एक निखळ झरा
सतत खळखळ वाहणारा
जरी आला उन्हाळा, तरी उरात ओलावा जपणारा ,
आणि परत पावसाळ्य़ची वाट पाहणारा
अशी असते आठवणं

आठवणं म्हणजे कधी काळची स्वछ दुपार
तरी संध्येसारखी कातर फार
अन पहाटेच्या प्रहरात जी आठवत राहते
ती शांत नीशेची सुरेल तार
अशी असते आठवणं ।

आठवणं म्हणजे एका लाटेची भेट कीनाऱ्याशी
वेळ काही क्षणांची
तरीही ओढ़ हजारो मैलांची
अशी असते आठवणं ।

आठवणं म्हणजे पारिजातकाचा मंद सुवास
वाऱ्यातूनही वहाणांरा
झाडावर ऐटीत फुलल्यावर
पाचोळ्य़तही सजणारा
अशी असते आठवणं ।

संकेत कुळकर्णी

Monday, August 24, 2009

जीव्हाळा



जगता जगता स्वतासाठी
जगु लागलो दूसऱ्यासाठी,
कोणास ठाउक कश्यासाठी,
स्फुंदु लागलो परक्यासाठी।

अणि मग,
माझ्यातला मी वाळून गेला
काच आली अन आरसा गेला
आधी नुसतेच गुण दिसत,
अता वाणही दीसू लागला।

नसण्याची खंत सांगताना,
असणारा प्रकाशही लपत राहिला
आधी अर्धा रिकामा म्हणत होतो
आता अर्धा भरलेला भासु लागला।

आपल्याच वेदनांच्या घेरावात,
जगातल्या दुःखांचा चेहरा दिसलाच नव्हता
तेव्हा एकटाच रडायचो
पण आता वेदनेलाही साथीदार लाभला होता।

पाउस पडू लागल्यावर
आपलाच घडा भरत धावत रहिलो,
तेव्हा फ़क्त पाणीच भराय्चे
आता तो समाधानाने भरु लागला।

कोणाच्या कधीच अध्यात नव्हतो ना होतो मध्यात
असो मग हीवाळा वा उन्हाळा,

पण आता मात्र ख़ात्री वाटते,

गेल्यानंतर ही सदैव वाटेल, कोणाला तरी जीव्हाळा।





संकेत कुळकर्णी

Saturday, August 15, 2009


स्वप्न



आस उद्याची धरून मनाशी
सोसत भोगत जगतो मी
स्वप्नांच्या अंधारात माझ्या
उज्वल भवीष्य बघतो मी

कधी धडपड़त कधी भरकटत
चीखलात रुतून जातो मी
पण स्वप्नात माझीया
याच चीखलातुन कमल बनू पाहतो मी

कधी पत्रीकेतील ग्रह, तर कधी इतरांचे शह
पाहून पुरता खचतो मी ,
चहुबाजुस मृगजळ असता
त्यातही घसरून पडतो मी
पण असतात जवळ स्वप्नांच्या कुबड्या
म्हणुनच पुन्हा उठतो मी

परीस्थीतीच्या सेकंदाचे , अन प्रसंगाच्या मीनीटांचे
हे घड्याळ आयुष्याचे ,
जगत असतो त्यात सतत, बनुनटप्पे तासांचे
माला वाटते जगतो मी , तासांच्याच या बदलांनी
पण असते चावी स्वप्नानचीच जी फीरवते त्यास एकसारखे

म्हणुन जेव्हा चुकत वीसरत , रडत खडत
अपयशी दीवस जगतो मी
पुन्हा एकदा त्या रात्री
स्वप्न उद्याचे बघतो मी



संकेत कुळकर्णी

Sunday, August 2, 2009


ओळख


ओळख देत फीरत असतो ओळखीच्या लोकांना
आप्त मी शोधत असतो आपल्यातील इच्छांना 
अन ओळखीच्यांवर चीडत असतो,

ओळख त्यांनी नाकरताना.. 

नीस्वारथाची ठेवून आस

बरसत असतो तासंतास

जरी लाभली सख्खी साथ

आठवत राहतात, ते फसवे हा



मग वाटतं तेव्हा, कोण होते ते सारे

होते नाते कोणत्या जन्माचे

कही क्षणांच्या पहील्या अन शेवटच्या भेटीत

करून गेले उपकार उभ्या आयुष्याचे

माझी ओळख नव्हती त्या माणसांशी
पण ओळख होती त्यांना, ती माणसाची
म्हणुनच तीथे नव्हतं अपेक्षांचं ओझं ना होती इछांची भूक
होती ती फक्त माणुसकी ज्यास होती अपुलकीची ऊब

नात्याची ओळख न ठेवल्याचे ओझे सोसत
जगण्या पेक्षा,
एकाच ओळखीत नातं देऊन गेलेले हे सारे
पावती देतात ती आपल्याच चंगुलपणाची

म्हणुनच, माणसांच्या प्रचंड गर्दीत ही
नीरमनुष वाटणाऱ्या या बेटावर
एखाद्या हीतचींतकाची वाट पाहाताना
आज ओळख पटत्ये ,ती त्या साऱ्या अनोळखी माणसांची



संकेत कुळकर्णी

मनं


समजूतदारपणाचं खडतर कवच मीरवतं 
अन कर्तव्याचे सल्ले देत वावरतं
पण आपल्याच ईछांशी तडजोड करताना
थेंबा थेंबात हेच कवच वीरघळु पहातं हे मनं

कोण कुठला वाऱ्यावरचा ,असतो वाटसरू तासाभराचा
पण नात्यातील जवळीक न मोजता ,
सुखास त्याच्या न्यायास त्याच्या
भांडू लागतं जगाशी हे मनं

दुःखाला वाटा नसतात , असतो एक सरळ रास्ता
वाटा असतात सुखाला , प्रेमाला अन सौख्याच्या मैत्रीला
याच सुखाचे वाटसरू नीवडताना
मुखवट्यांमध्ये भांबावून जातं हे मनं

आपलं कोण नी परकं कोण
सारखे नीकष बदलत असतात
 उगाच इतरांना न पेलणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याने खचण्यापेक्षा
अलीप्त आप्त शोधू लागतं हे मनं

पण माणसांची अनेक मापं असणाऱ्या ,
सुख दुःख तोलणाऱ्या या आयुष्याच्या तराजूत
मायेच्या स्पर्शाने मोहरतं ,
अन प्रेमगंधाने पुन्हा पुन्हा फूलते हे मनं



संकेत कुळकर्णी