Monday, August 24, 2009

जीव्हाळा



जगता जगता स्वतासाठी
जगु लागलो दूसऱ्यासाठी,
कोणास ठाउक कश्यासाठी,
स्फुंदु लागलो परक्यासाठी।

अणि मग,
माझ्यातला मी वाळून गेला
काच आली अन आरसा गेला
आधी नुसतेच गुण दिसत,
अता वाणही दीसू लागला।

नसण्याची खंत सांगताना,
असणारा प्रकाशही लपत राहिला
आधी अर्धा रिकामा म्हणत होतो
आता अर्धा भरलेला भासु लागला।

आपल्याच वेदनांच्या घेरावात,
जगातल्या दुःखांचा चेहरा दिसलाच नव्हता
तेव्हा एकटाच रडायचो
पण आता वेदनेलाही साथीदार लाभला होता।

पाउस पडू लागल्यावर
आपलाच घडा भरत धावत रहिलो,
तेव्हा फ़क्त पाणीच भराय्चे
आता तो समाधानाने भरु लागला।

कोणाच्या कधीच अध्यात नव्हतो ना होतो मध्यात
असो मग हीवाळा वा उन्हाळा,

पण आता मात्र ख़ात्री वाटते,

गेल्यानंतर ही सदैव वाटेल, कोणाला तरी जीव्हाळा।





संकेत कुळकर्णी

1 comment: