Sunday, August 2, 2009


मनं


समजूतदारपणाचं खडतर कवच मीरवतं 
अन कर्तव्याचे सल्ले देत वावरतं
पण आपल्याच ईछांशी तडजोड करताना
थेंबा थेंबात हेच कवच वीरघळु पहातं हे मनं

कोण कुठला वाऱ्यावरचा ,असतो वाटसरू तासाभराचा
पण नात्यातील जवळीक न मोजता ,
सुखास त्याच्या न्यायास त्याच्या
भांडू लागतं जगाशी हे मनं

दुःखाला वाटा नसतात , असतो एक सरळ रास्ता
वाटा असतात सुखाला , प्रेमाला अन सौख्याच्या मैत्रीला
याच सुखाचे वाटसरू नीवडताना
मुखवट्यांमध्ये भांबावून जातं हे मनं

आपलं कोण नी परकं कोण
सारखे नीकष बदलत असतात
 उगाच इतरांना न पेलणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याने खचण्यापेक्षा
अलीप्त आप्त शोधू लागतं हे मनं

पण माणसांची अनेक मापं असणाऱ्या ,
सुख दुःख तोलणाऱ्या या आयुष्याच्या तराजूत
मायेच्या स्पर्शाने मोहरतं ,
अन प्रेमगंधाने पुन्हा पुन्हा फूलते हे मनं



संकेत कुळकर्णी

2 comments:

  1. this is an ace , an ace of hearts
    I am a big fan of ths style of poetry , and ths one is fantastic

    ReplyDelete
  2. kavi sanket kulkarni....chaan ahet kavita....

    ReplyDelete