Tuesday, March 2, 2010

आठवणं


कशी असते आठवणं ?
धरतीवर पडणारे ते कीरणांचे दीप का त्यावर डोलणारे ते दळदार पीक
पिल्लाची घरट्याकड़े पुन्हा पुन्हा बोलवण
का खोलवर दडलेली एखादी गोडशी साठवण
कशी असते आठवणं ?

आठवणं म्हणजे एक निखळ झरा
सतत खळखळ वाहणारा
जरी आला उन्हाळा, तरी उरात ओलावा जपणारा ,
आणि परत पावसाळ्य़ची वाट पाहणारा
अशी असते आठवणं

आठवणं म्हणजे कधी काळची स्वछ दुपार
तरी संध्येसारखी कातर फार
अन पहाटेच्या प्रहरात जी आठवत राहते
ती शांत नीशेची सुरेल तार
अशी असते आठवणं ।

आठवणं म्हणजे एका लाटेची भेट कीनाऱ्याशी
वेळ काही क्षणांची
तरीही ओढ़ हजारो मैलांची
अशी असते आठवणं ।

आठवणं म्हणजे पारिजातकाचा मंद सुवास
वाऱ्यातूनही वहाणांरा
झाडावर ऐटीत फुलल्यावर
पाचोळ्य़तही सजणारा
अशी असते आठवणं ।

संकेत कुळकर्णी

3 comments:

  1. mindblowing sanket!really,hats of to u

    ReplyDelete
  2. amazing.!!!"Aathvan"
    really...hats off 2 u..!!

    ReplyDelete
  3. manaala bhidnari kavita ahe. masta!

    ReplyDelete