Monday, October 27, 2014


ती पाकळी फ़ूलाची


वाऱ्याची झुळक माला गंध पांघरून गेली
ती पाकळी फ़ूलाची मज आठवून गेली

पायघड्या पाचोळ्याच्या प्राजक्त शिंपीत होता
चाल माझी त्यावर आडखळून गेली   
ती पाकळी फ़ूलाची मज आठवून गेली

हौद पायथ्याशी तीस साद घालीत होता
ओघळून ती त्यावर, तरंगून त्यात गेली
ती पाकळी फ़ूलाची मज आठवून गेली

दागिना दवबिंदूचा अंगी डळमळत होता
भार त्याचा पेलत ती सावरून गेली
ती पाकळी फ़ूलाची मज आठवून गेली

ढग काळा रूप तिचे झाकोळत एक होता
रवीकिरणाला मोहून  ती बिलगून त्यास गेली
ती पाकळी फ़ूलाची मज आठवून गेली


संकेत कुळकर्णी

No comments:

Post a Comment